कितीही जुनी दम्याची समस्या असो , १० दिवसात होईल गायब. करा हे घरगुती उपाय

0

आपल्या देशात श्वसना संबंधित खूप विकार वाढलेत आणि त्या विकारांमध्ये दमा किवा अस्थमा हा एक मोठा विकार ठरला आहे. भारता मध्ये दिवसागणिक अस्थमाच्या रुग्णांच्या संखेत वाढ होत आहे. अस्थमा मुळे खोकून खोकून रुग्णांची फार बिकट अवस्था आहे , दमा होण्याचे मुख्य कारण हे कुठल्या तरी गोष्टीची एलर्जी असणे हे आहे आणि हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला  होऊ शकतो आणि त्याशिवाय इतर कारण आहेत जसे कि हवेचे प्रदूषण.

आपल्या वातावरणात दिवसागणिक खूप बदल होतोय कधी अचानक ढग दाटून येतान तर कधी अचानक वातावरण थंड होत ,तर कधी अचानक उष्मा वाढतो ह्या सगळ्यांमुळे तसेच मानसिक आवेग हे देखील एक महत्वाचे कारण आहे. घरगुती वापरातील वस्तूंची एलर्जी जसे कि साबण , तेल ,पावडर काही खाद्य पदार्थ जसे कि अंडे , भाज्या , मासे टमाटर ,घरातील पाळीव प्राणी यामुळे हि एलर्जी होऊ शकते

अस्थमा चा अटैक तेव्हा येतो जेव्हा शरीरा मध्ये ऑक्सीजन ची कमतरता भासते. ज्यामुळे रुग्णाला दम लागतो, कारण ऑक्सीजन हा आपल्यासाठी प्राणवायू आहे आणि ह्या समस्येपासून सुटका करण्यासाठी काही घरगुती पण रामबाण उपाय आहेत जे अगदी सरळ आणि सोपे आहेत आणि त्यांचे काही side effect पण नाहीत

दमा किंवा अस्थमा दूर करण्यासाठी आपण मधाचा वापर करू शकतो , कारण मध हे एक आयुर्वेदिक औषध मानले जाते. जर एखाद्या व्यक्तीला श्वसना संबंधी काही समस्या किंवा अस्थमा असेल तर मध हे त्यावरचे एक रामबाण औषध ठरते. सकाळी उपाशी पोटी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून प्यायल्याने श्वसना संबंधी विकारांमध्ये आराम मिळतो. तसेच एका वाटीत मध घेऊन त्याचा वास घेतल्यानेही श्वसना संबंधी विकार दूर होतात.

मधा बरोबरच आल्याचे ( अदरक ) सेवन करणे खूप फायदेशीर असते. जर तुम्हाला आले घातलेला चहा प्यायची सवय असेल तर दमा होण्याची शक्यता फार कमी असते. कारण आल्यात विविध प्रकारचे एंटीऑक्सीडेंट तत्व असतात ज्यामुळे श्वसना संबंधी विकार दूर होतात. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गरम पाण्यात दोन ते तीन आल्याचे तुकडे, दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या टाकून हे पाणी सकाळ संध्याकाळ घेतल्याने अस्थमा मध्ये आराम पडतो. द्राक्ष सुद्धा दम्याच्या रुग्णांसाठी वरदान मानले जाते. द्राक्ष किंवा त्याचा रस हे दोन्ही दाम्यात लाभदायक आहेत. काही तज्ञांच्या मते दम्याच्या रुग्णास जर द्राक्षाच्या बागेत ठेवले तर या रोगापासून सुटका होण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

वेलची खाण्यासाठी जेवढी स्वादिष्ट असते तितकीच रोगांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. मोठी वेलची खाल्ल्याने उचकी आणि इतर श्वसना संबंधी विकारांमध्ये फायदा होतो.  याचे सेवन तुम्ही रोजच्या जेवणात टाकून करू शकता किंवा गरम पाण्यात आल्या सोबत उकळून करू शकता. आले आणि वेलची टाकलेल्या पाण्याचे सेवन केल्याने श्वसना संबंधी अनेक विकार दूर होतात. अगदी दमा सुद्धा.

रोज सकाळी खा फक्त एक खजूर : आणि बघा काय होईल कमाल.