पत्र… भाग 5 : अभिनव बसवर यांच्या लेखणीतून

0

मी याला फोन करून सगळं सांगितलं. “ही सही त्याच माणसाची आहे. तुझा विश्वास बसत नसेन पण हे खरंय. हा नेमका काय प्रकार आहे, हे तो माणूसचं सांगू शकतो.मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतेय. तू कुठेही बाहेर जाऊ नको. “ ते पत्र आणि सह्यांची वही बँगमध्ये भरली आणि लगोलग घराबाहेर पडले. मला उशीर होईल इतकचं आईला ओरडून सांगितलं. माझ्याकडे तिला सगळं सांगत बसण्यासाठी वेळचं नव्हता. ही उकल आता व्हायलाच हवी.

फ्ल्याट वर पोहचल्यानंतर आज हा पहिल्यांदा सिरीयस वाटला. त्या काकांना सगळं काही जाऊन विचारायचं हे मी ठरवलेलं. याचं म्हणनं होतं की, कोण कुठला तो म्हातारा, आपण कशाला जायचं त्याच्याकडे. पण मला हा गुंता सोडवायचाचं होता. त्याची तितकी इच्छा नसूनही मी त्याला काकांकडे घेऊन गेले.

दारावर आम्हा दोघांना पाहून काका थोडे शॉकचं झाले. मी सरळ आता येऊ का विचारलं. थोडसं नाखुशीनेच त्यांनी यायला सांगितल. “काका तुम्ही पेंटीग्ज काढता का ?” हो काढतो म्हणत आत जाऊन ते पेंटींग्ज घेऊन आले. अतिशय देखणी पेंटींग्ज होती. व्यक्तिचित्रे हा त्यांचा खास विषय. माणसाचे डोळे आणि चेहऱ्यावरील भाव उत्कृष्टरित्या टिपायचे. प्रत्येक पेंटिंगखाली ती सही दिसली. मी याला दाखवलं. बँगेतून वही काढली आणि काकांसमोर धरली. “ही तुमचीच सही आहे ना?.” चष्मा लावून त्यांनी पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली. “अरे हो तर, ? कुठे घेतली तू ही सही ?”…

मी ते पत्र काढून त्यांच्यापुढे ठेवलं तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. “हे तुम्हीच लिहलं ना ?” उत्तर द्यायचं त्यांनी टाळलं. मोबाईलमधला भैय्याचा फोटो दाखवला तसे ते उठूनच उभे राहिले. “काय हवंय तुम्हा दोघांना ? आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा.” त्यांचं ते विक्षिप्त वागणं पाहून हा म्हणाला, “काका जे विचारतोय ते सांगा नाहीतर सगळ्या सोसायटीला सांगेन की हा काय प्रकार चालूये इथं.” इतक्या वेळ गप्प बसलेला हा अचानक असा मदतील उभा राहिल्यानंतर मला हायसं वाटलं.

“काका तुम्ही कसं काय ओळखता या मुलाला ? हे पत्र वगैरे नेमका काय प्रकार आहे ?” थोड्यावेळ आम्हा दोघांचे चेहरे पाहून त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते बोलत असताना.एक एक पेंटिंग मी नीट पाहत होते…

“समीर याचं नाव. उत्कृष्ट पेंटींग्ज काढतो. न्यूड पेंटिंग काढण्यात त्याला विशेष आवड. एकदा माझ्याकडे आला आणि शिकवा म्हणाला. पहिल्यांदा मी त्याची टेस्ट घायची ठरवलं. समोर कोणी नसतानाही सात-आठ तासांमध्ये उत्कृष्ठ पेंटिंग पठ्ठ्याने तयार केलं. मन जिंकलं पोराने. मी त्याला शिकवेन असं सांगितल.”…

पेंटिंग पाहत असताना अचानक त्या बाईचं न्यूड पेंटिंग माझ्यासमोर आलं. त्याखाली सही नव्हती. “हे कुणाचं आहे ?” मी काकांना विचारलं..(समीर माझा भाऊ आहे हे मी मुद्दामून त्यांना कळू दिल नाही…)

“ही बाई माझ्या चांगलीच ओळखीतली. मोठ्या घरातील. कलेची भारी हौस. फोटोज काढण्यापेक्षा स्वतःची पेंटींग्ज काढून घेण्यात विशेष रस. मी स्वतः तिची कितीतरी पेंटींग्ज काढलेली. कोणताही आडपडदा न ठेवता संपूर्ण नग्न होऊन हव्या त्या पोजमध्ये ती तासनतास बसून राहायची. काढलेली न्यूड पेंटींग्ज ती कधीच घरी घेऊन गेली नाही. समीरने या बाईचं चित्र काढावं असं मला मनापासून वाटलं. दिवस ठरला आणि दोघांनाही इथे बोलावलं. समीरला सुरवातीला काहीच समजेना की ही बाई नेमकी कशासाठी आलीये. बघता बघता तिने सगळे कपडे काढून टाकले आणि कॅनव्हाससमोर गळ्यात फक्त मंगळसूत्र घालून एका अंगावर झोपली. तुला हिचं पेंटिंग बनवायचंय. समीरला काहीच कळेना. त्याने आजपर्यंत असं कोणाला समोर बसवून वगैरे नव्हतं कधी पेंटिंग बनवलेलं. तो सुरवातीला नाही म्हणून चाललेला, पण मीच त्याला आडवलं आणि कामावर लक्ष देण्यास सांगितलं. जसा त्याने ब्रश हातात घेतला तसं पूर्ण एकाग्रपणे कँनव्हासवर स्ट्रोक्स द्यायला सुरुवात केली. मी पाहतच राहिलो. इतके फास्ट आणि परफेककट शेड्स मीदेखील कधी दिले नव्हते…”

“त्या बाईला समीरने काढलेलं पेंटिंग फार आवडलं. तिने अजून पाच पेंटींग्ज त्याच्याकडून काढून घ्यायचं ठरवलं. चेकसुद्धा साईन केला. जाताना ती त्याच्या हातावर किस करून गेली. एक दोन आठवडे गेले असतील. त्या बाईचा मला फोन आला आणि दिवस ठरवायला सांगितला. यावेळी फक्त समीर तिथे असेल आणि तुम्ही थाबायचं नाही. तिने मला बजावलं. मी समीरला दिवस कळवला. तो ठरल्या वेळेवर पोहचला देखील. दार या बाईने उघडल्यानंतर त्याला काहीच कळेना. त्यादिवशी पेंटिंग करत असताना तिने समीरला सिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. कामावरून लक्ष विचलित होऊ लागल्यामुळे समीरने निघण्याचा निर्णय घेतला पण तिने त्याला जबरदस्तीने थांबवून घेतलं. भल्या भल्या अप्सरा फिक्या पडतील असं तिचं सौंदर्य. शरीरावर कुठे साधा हलकासा डाग देखील नाही. उजळ कांती. गोरापान रंग. समीर मोहित झाला. क्षणभर तिच्यात हरवून गेला आणि दोघांच्यात शरीरसंबंध झाले. ते पेंटिंग अर्धवटचं राहिलं.

दुसर्यादिवशी समीर मला भेटायला आला तेव्हा त्याने मला सगळं सांगितलं. चूक झाली म्हणाला. या बाईच पेंटिंग करणार नाही असं त्याने ठरवलं आणि तडक निघून गेला.याबद्दल त्या बाईला कळवल्यानंतर ती भलतीच चिडली. कॉनट्रँक्ट साईन केलंय याची आठवण करून दिली. मला त्याच मुलाकडून पेंटींग्ज काढून हवेत असा हट्टच धरला. मी समीरला सांगितलं तर त्याने सरळ धुडकावून लावलं. इतकं करुनही हा ऐकत नाही म्हणल्यानंतर या बाईने नवीन डोकं लावलं. माझ्यासमोर अजून एक चेक फाडून ठेवला आणि मला रंगानी काही पत्रं लिहण्यास सांगितली. पत्र मी लिहली पण मजकूर तिने सांगितलेला होता. त्यामध्ये तिने दोघांमध्ये झालेल्या शरीरसंबंधाबद्दल अगदी खोलात जाऊन वर्णन केलं. छातीवर गोंद्लेल्या त्या दोन अक्षरांना समीरने ओठांनी कसा स्पर्श केलेला याचं रसभरीत कथन केलं. समीरच्या शरीरावरील बारीक खुणा सुद्धा सांगितल्या. ही पत्रं समीर ला देण्यास सांगितली आणि त्याला भेटायला बोलावलं. कसंही करून तिला पुन्हा पुन्हा त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवायचे होते. पेंटींग्जचं कारण पुढे करून पुन्हा त्याला गुंतवू पाहत होती.”

“समीर मात्र हुशार निघाला. त्याने सगळी पत्रं मला आणून दिली आणि तिच्यासाठी स्वतः एक पत्र लिहलं, ‘तू केलेल्या या वर्णनावरून प्रणय अवस्थेतील तुझं हुबेहूब पेंटिंग मी बनवू शकतो. मला माहितेय तू तुझं कुठलंही न्यूड पेंटिंग घरी घेऊन जात नाही. हा विषय जर तू संपवला नाहीस तर तुझ्या न्यूड पेंटींग्जचं मी प्रदर्शन भरवेन इतकचं नाही तर वेबसाईटस वर त्याचे फोटोही देईन. त्यामुळे मला गुंतवण्याचा विचार तू मनातून काढून टाक.’ हे पत्र वाचल्यानंतर रागाने तिने आदळआपट केली. त्याला गुंतवण्याचा आता तिच्याकडे कोणताच मार्ग नव्हता. समीर सुटला यातून…

ती बाई मात्र माझ्याकडे पेंटींग्ज काढण्यासाठी येते. आजही येणार आहे ती.”

काकांनी सांगितलेलं ऐकल्यानंतर ते उरलेलं एक पत्र आणि लिफाफे त्यांना देऊन आम्ही निघालो. लिफ्ट्समोर थांबलो असताना ती बाई लिफ्टमधून बाहेर आली आणि याच्याकडे डोळ्यांनी आदा देत काकांच्या घराच्या दिशेने गेली. मी मात्र तिचं ते सौंदर्य पाहत राहिले….समाप्त

– अभिनव बसवर

पत्र… भाग 4 : अभिनव बसवर यांच्या लेखणीतून