या ट्रिक ने ५ मिनिटांत दूर होईल दातांचा पिवळेपणा

0

बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीला खाण्या पिण्याची आवड असते… आज काल लाईफ एवढी धावपळीची आहे कि आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो किंवा असे म्हणा कि वेळच मिळत नाही. अशात तुम्ही जे खाता त्याचे अंश आपल्या दातांत अडकून राहतात , जे तुम्हाला कळत नाही. आणि म्हणून दातांवर पिवळा रंग चढतो.

हेच ते कारण आहे ज्यामुळे कमी वयात सुद्धा दातांवर पिवळेपणा येतो आणि दातांची चमक निघून जाते. म्हणून आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत जो केल्याने पाच मिनिटांतच तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी होऊन दात चमकू लागतील. दातांना चमकवण्यासाठी सर्व प्रथम हे करा. सर्वप्रथम सफरचंद आणि गाजर या दोघांचा वापर जेवणात करा. कारण या दोघांमुळे तोंडात लाळ निर्माण होते आणि दातांची चमक टिकून राहते. या सोबतच तंबाखू किंवा गुटखा खाण्याची सवय असेल तर ती सवय सोडून द्या. कारण एक तर अशा पदार्थांचे सेवन मानवी शरीराला हानिकारक आहे आणि याचे सेवन केल्याने दातांवर पिवळेपणा येतो.

चला तर मग जाणून घेऊ काय उपाय करावा लागेल. सर्वात आधी सफरचंदाचा एक तुकडा घेऊन तो आपल्या दातांवर हलक्या हाताने घासा. असे केल्याने दातांची चमक वाढेल. सफरचंदात मैलिक ऍसिड असते , ज्यामुळे दातांमधील पिवळेपणा दूर होतो. या व्यतिरिक्त रोज बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने सुद्धा दातांवरील पिवळेपणा दूर होतो. दातांची वेळच्या वेळी चेक अप करून घ्या , जेणेकरून दातांत काही कीड किंवा अजून काही असल्यास लगेच कळेल.

शक्य असेल तेवढे चहा आणि कॉफी पासून दूर राहा , कारण यात कैफींन असते जे दातांचा पिवळेपणा वाढवते. जर तुमचे दात सुरक्षित आणि मजबूत राहावे असे वाटत असेल तर शक्यतो या गोष्टी टाळाव्या. दात सफेद आणि चमकदार असतील तर हसण्यामागे कारण शोधावे लागत नाही , केव्हाही आणि कुठेही निखळ हसू शकतो.

कितीही जुनी दम्याची समस्या असो , १० दिवसात होईल गायब. करा हे घरगुती उपाय