पैज…एक लव्हस्टोरी : अभिनव बसवर यांच्या लेखणीतून

0

पैज…

साधारण दोन तीन महिन्यामध्ये तिचं ब्रेकअप व्हायचं. तो फारच पजेसिव्ह झालाय हे प्रत्येकवेळी एकमेव कारण. पहिल्यापासून बिनधास्त जगण्याची सवय. थोड्सुद्धा बंधन सहन व्हायचं नाही. आई वडील दोघेही आपापल्या नोकरीमध्ये व्यस्त. काही हवं नको असेल तर लगेच हातामध्ये हजर.

मध्यंतरी कोलेजबाहेरील एका मुलाच्या प्रेमात पडली. तो जॉब करायचा. दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी तो गेटवर हजर. दोघेही लांब कुठेतरी फिरून यायचे. दिवसभर चाटिंग सुरूच असायची. हिच्यापेक्षा तो तसा वयाने फारच मोठा. हि त्याला पिलुडी वगैरे करायची तेव्हा वर्गातील मुलांची तोंड बघण्यासारखी व्हायची. हि काय जास्त काळ याच्यासोबत टिकणार नाही यावर मुलांमध्ये पैज देखील लागायची.

व्हायचं देखील तसच. थोड्याच दिवसामध्ये तिचा इंटरेस्ट संपून जायचा. दरवेळी नवीन रिलेशन मध्ये गेली कि सगळ्या मैत्रिणींना बॉयफ्रेंडची ओळख करून द्यायची. नंतर नंतर तिला सिरीयसली घेण सार्यांनीच सोडून दिल. लोकं आपल्याला दुर्लक्ष करतायत हे बघून तिची चीड चीड वाढली. मैत्रीणीना वाट्टेल ते बोलू लागली. एका लिमिट नंतर तिचं कोणी ऐकेणा.

वर्गातील मुले देखील भाव देईनात. कितीही मेकअप केला तरी कोणी ढुंकून बघेना. सतत आपल्याकडे कोणीतरी पाहावं, काळजी घ्यावी, विचारपूस करावी या तिच्या अपेक्षांना सुरुंग लागला. स्वतःहूनच ती एखाद्या मुलाशी बोलू लागली तरी तेवढ्यापुरता गोड बोलून तोही तिच्यापासून लांब राहायचा. या सगळ्याचा परिणाम रिझल्ट वर झालाच. आधीच कसेबसे पन्नास टक्के मिळायचे. यंदा दोन विषय बँक राहिले.

शेवटी तसही लास्ट इयर असल्यामुळे घरच्यांनी स्थळे पाहायला सुरुवात केलेली. एक मुलगा तिला पसंद पडला. तिने होकार कळवला. दुसर्याचदिवशी त्याच्यासोबतचा सेल्फी व्हाटसएप डीपीला तिने लावला आणि आता इकडे तिच्या घटस्फोटावर पोरांनी पैज लावली…..

– अभिनव बसवर

पत्र… भाग १ : अभिनव बसवर यांच्या लेखणीतून