मोरपीस (मोरपंख) जवळ ठेवल्याने होतील हे ११ फायदे

0

हि गोष्ट जगजाहीर आहे कि मोराचे पंख जवळ ठेवल्याने नकारात्मक उर्जा दूर राहते आणि आपल्या जीवनात सकारत्मक उर्जेचा संचार होतो. इंद्र देवांना मोराचे सिंहासन अति प्रिय आहे, आणि याच मोर पंखाला भगवान श्रीकृष्णाने आपल्या मुकुटावर स्थान दिले आहे. इतकेच नाही तर पुराण काळात अनेक महर्षी आणि ऋषींनी मोर पंखाची लेखणी बनवून अनेक पौराणिक ग्रंथांची रचना केली आहे. या उदाहरणांवरून हेच ज्ञात होते कि मोर पंख किती पवित्र आणि महत्वपूर्ण आहे. प्राचीन काळापासूनच मोर पंखांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जात आहे.

मोर पिसाचे काही विशेष उपाय जे आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतात :

१) मोराचे पंख कोणत्याही वास्तूतील वाईट गोष्टी आणि प्रतिकूल गोष्टींच्या प्रभावापासून आपले रक्षण करते. म्हणून मोरपीस कायम घरात ठेवले पाहिजे , ज्यायोगे वास्तूत सकारत्मक उर्जेचा वास राहतो.

२) मोराचे पंख वापरून भूत बाधा, नजर दोष, रोग मुक्ती,ग्रह दोष आणि वास्तू दोष यांसारख्या अडचणी पासून सुटका होते.

3) शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोराचे पंख फायदेशीर आहे. पुस्तकात मोराचे पंख ठेवून विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. याव्यतिरिक्त मंत्र जपासाठी वापरल्या जाणाऱ्या जपमाळेला मोरपंखात ठेवले पाहिजे.

४) मोरच्या पंखांचा उपयोग आपल्याला नव ग्रहांची वाईट स्थिती टाळण्यास देखील मदत करू शकतो. घरात वेगवेगळ्या ठिकाणी मोराचे पंख ठेवून घराचे वास्तू दोष काढून टाकले जाऊ शकतात.

५) मोर पिसाचा वापर रोगांच्या उपचारासाठी केला जातो. क्षयरोग, दमा, अर्धांगवायू आणि वंध्यत्व यांसारख्या रोगांवर मोर पंखांपासून उपचार करता येतात.

६) घराच्या अग्नेय (दक्षिण-पूर्वेकडील) दिशेत, मोराचे पंख ठेवल्यास घरामध्ये भरभराट होते.घरातील व्यक्तीवर अचानक येणाऱ्या संकटापासून रक्षा होते.

७) मोर आणि साप यांच्यातील शत्रुत्व तुम्हाला माहीतच असेल , म्हणूनच ज्या घरात मोरपंख असतात त्या घरात साप प्रवेश करत नाहीत. याशिवाय मोराचे पंख घरातील पूर्व आणि वायव्य (उत्तर पश्चिम) दिशेला ठेवल्याने राहू दोष नाहीसा होतो.

८) मोराचे पंख कोणत्याही राधाकृष्ण मंदिरामध्ये कृष्णाच्या मुकुटात ४० दिवस स्थापन करून रोज संध्याकाळी खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवावा. नंतर ४१ व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून आपल्या तिजोरीत ठेवावे. तुम्ही स्वताच अनुभवाल कि घरात सुख आणि शांतीची वृद्धी होत आहे.

९) या मोर पंखात कालसर्प दोष नष्ट करण्याची अद्भुत क्षमता आहे. कालसर्प असलेल्या व्यक्तीने सोमवारी रात्री ७ मोराचे पंख उशीखाली ठेवावेत… ज्यायोगे कालसर्प दोषापासून मुक्ती मिळेल.

१०) जर तुम्ही एखाद्या शत्रू पासून त्रास होत असेल तर शनिवारी किंवा मंगळवारी मोरपिसावर शत्रूचे नाव हनुमानाच्या मस्तकावरील शेंदुराने लिहावे आणि हे मोरपीस रात्र भर घरातील देव्हार्यात ठेवावे. सकाळी उठून आंघोळ न करता ते मोरपीस वाहत्या पाण्यात सोडून द्यावे. अस केल्याने शत्रू सुद्धा लवकरच मित्रा प्रमाणे वागू लागेल.

११) जर घरातील एखादे मुल खुपच हट्टी असेल तर मोरपिसाची हवा दिल्याने त्याचा हट्टीपणा हळू हळू कमी होऊ लागेल. मोर पिसाला चांदीच्या ताईत मध्ये टाकून हे ताईत नवजात बालका जवळ ठेवल्यास त्याला नजर दोष लागत नाहीत.

नोट : या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती संशोधनावर आधारित आहे. तरी तुम्ही हे उपाय करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

वयाने मोठ्या असलेल्या मुलीसोबत लग्न केल्याने होतात हे ४ फायदे. ३ रा फायदा बघून थक्क व्हाल