ब्रा खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी : खास महिलांसाठी

0

आपल्यापैकी बहुतांश महिला अंतरवस्त्र खरेदी करताना चंचल मनस्थितीत असतात. ज्यात निकरच्या बाबतीत सर्व ठीक असते मात्र जेव्हा ब्रा खरेदी करायची वेळ येते तेव्हा काही महिलांना संकोच वाटतो. ज्यामुळे बऱ्याचदा ते चुकीच्या ब्रा ची निवड करतात. एका सर्वे मध्ये असे आढळून आले आहे कि जवजवळ ९० टक्के मुली चुकीच्या साईजच्या ब्रा घालतात. कारण त्यांना हेच माहित नसत कि आपल्या स्तनाना कोणता ब्रा परफेक्ट बसेल.

ज्या प्रमाणे महिला कपडे खरेदी करताना फिटिंगची काळजी घेतात त्याचप्रमाणे ब्रा खरेदी करताना सुद्धा फिटिंग वर लक्ष ठेवणे जरुरी आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही ब्रा खरेदी करायला जाता तेव्हा दुकानदार तुम्हाला खूप सारे ऑप्शन देतो. पण बऱ्याचदा हजारो ऑप्शन असून सुद्धा चुकीचा ब्रा निवडला जातो. कारण बहुतांश महिलांना ब्रा खरेदी करण्याचे नियम माहित नाहीत आणि त्या उगीच महागडा ब्रा खरेदी करतात.

महिला विचार करतात कि योग्य ब्रा निवडण्यात खूप वेळ जातो, वास्तव असे काही नाही. योग्य फिटिंग आणि मापाची ब्रा खरेदी करणे काही अवघड काम नाही. हो यात थोडा वेग लागतो पण तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्याल तर कधीच चुकीच्या साईजची ब्रा खरेदी करणार नाही… आज आम्ही तुम्हाला योग्य ब्रा कशी निवडावी या बद्दल काही टिप्स देणार आहोत जेणेकरून तुम्ही भविष्यात कधीच चुकीचा ब्रा खरेदी करण्याची चूक करणार नाही.

कशी असावी तुमची ब्रा :

ब्रा खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला हे माहीत असंण जरुरी आहे कि तुम्ही कोणत्या प्रकारची ब्रा निवडणार आहात ? आजकाल बाजारात खूप प्रकारचे स्टाईलिश आणि फॅब्रिक ब्रा उपलब्ध आहेत ज्यात तुम्हाला तुमच्या आवडीची आणि फिटिंगची ब्रा निवडायची असते. जर तुम्हाला छोट्या स्तनांना मोठे स्तन म्हणून दाखवायचे असेल तर पैडेड ब्रा हा तुमच्यासाठी योग्य ऑप्शन आहे… एक्सट्रा सपोर्ट हवा असेल तर अंडर वायर ब्रा खरेदी करू शकता. याव्यतिरिक्त जर तुम्ही व्यायाम , एक्सरसाइज इत्यादी करत असाल तर तुमच्यासाठी स्पोर्ट्स ब्रा हि योग्य राहील…

योग्य जागेवरून खरेदी करा ब्रा :

ब्रा चुकूनही ऑनलाईन खरेदी करू नका. नेहमी खरेदी करताना लेडीज अंडर गारमेंट जिथे विकायला उपलब्ध असतात अशाच दुकानातून खरेदी करा. आणि जर शक्य असेल तर ट्रायल रूम मध्ये जाऊन एकदा ट्राय करून बघा. याशिवाय जर तुम्ही एखाद्या ब्रँड विषयी खात्रीशीर असाल आणि तुम्हाला साईज वगैरे सर्व माहीत असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवायला काही हरकत नाही…

स्वतःच्या कम्फर्टचे ठेवा भान :

बहुतेक महिलांना हि गोष्ट माहित नसेल कि इनरवियरचा शरीरावर खूप प्रभाव पडतो. म्हणून ब्रा खरेदी करताना अशी घ्या कि ज्यात तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होता कामा नये. कारण जर तुम्ही जास्त घट्ट ब्रा घातली तर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होईल आणि छातीत त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच जास्त घट्ट ब्रा घातल्याने त्याचे व्रण पाठीवर आणि स्तनांच्या खाली उठले जाऊ शकतात…

स्तनांवर परफेक्ट फिट :

आपण नेहमी अशीच ब्रा खरेदी करावी ज्यात बाजूने बाहेर आले नाही पाहिजेत. असा प्रॉब्लम बहुतांश गरजेपेक्षा मोठी साईज किंवा छोट्या साईजच्या ब्रा मध्ये होतो. म्हणूनच कपच्या साईजचे भान ठेवा.

ब्रा सरकला नाही पाहिजे :

ब्रा खरेदी करताना याचे खास भान ठेवा कि तुमची ब्रा इकडे तिकडे सरकता कामा नये. अर्थात तुमच्या खांद्याची स्ट्रीप पडत असेल तर तिला ऍडजस्ट करा , हे करून सुद्धा ब्रा फिट बसत नसेल तर समजून जा कि ब्रा लूज आहे…

वाकून बघा :

ब्रा साईज चेक करण्यासाठी तुम्ही हि पद्धत सुद्धा वापरू शकता. यासाठी तुम्ही पुढच्या बाजूला वाकून एकदा बघा कि वाकल्याने स्तन बाहेर तर येत नाहीत ना ? असं असेल तर समजा कि तुमच्यासाठी हि ब्रा योग्य नाही.

दोन बोटांचा नियम :

जेव्हा पण तुम्ही ब्रा घालून बघाल तेव्हा या गोष्टीचे भान ठेवा कि ब्रा स्ट्रिप्स आणि ब्रा ब्रा बैंड यांच्या आतून तुमची दोन बोट आरामात आत जायला हवी. यामुळे तुम्ही लांब काळापर्यंत कम्फर्टेबल राहू शकता.

या गोष्टीचे सुद्धा ठेवा भान :

यासोबतच तुम्ही उजव्या डाव्या बाजूला वळून बघा, ब्रा तिच्या जागी योग्य आहे कि नाही ते बघा ? जर ब्रा स्थिर नसेल राहत तर ती ब्रा खरेदी करू नका.ब्रा खरेदी करण्यापूर्वी तुमच्या स्तनांची साईज जरूर चेक करा.

आई वडिलांच्या या एका चुकीमुळे जन्माला येतात छक्के ( तृतीय पंथी )