मुळव्याधा वर करा हा आयुर्वेदिक रामबाण उपाय : ७ दिवसात पडेल फरक

0

मूळव्याध हा असा आजार आहे , ज्यावर चर्चा करणे माणसाला अवघड वाटते आणि तो या आजाराला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हा आजार हळू हळू मोठा आकार घेऊ लागतो. हा असा एक आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो…या बाबतीत लाज बाळगायची काही गरज नाही. तुम्हाला या आजाराबद्दल संपूर्ण माहिती असणे आणि यावर उपाय जाणून घेणे फार गरजेचे आहे , जेणेकरून भविष्यात हा आजार वाढू नये. या आर्टिकल मध्ये मुळव्याधा वर आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे , जो पूर्ण पणे या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे काम करतो. हा इलाज करताना तुम्हाला सयंम पाळणे खूप महत्वाचे आहे…

काय आहे मूळव्याध :

जेव्हा शरीरातील खालच्या जागी गुदद्वारा जवळ सूज येते याला बवासीर किंवा मूळव्याध असे म्हटले जाते. याला हेमोर्रोइड्स या नावाने सुद्धा संबोधले जाते. पाईल्सच्या आजारात वेदना होतात , सूज येते आणि सोबतच मलातून रक्त पडते. मूळव्याध दोन प्रकारचे असते , आतील आणि बाहेरील. आतील मुळव्याधात आतल्या आत रक्तपात होतो ज्यात वेदना होत नाहीत उलटपक्षी बाहेरील मुळव्याधात वेदना होतात कारण गुद्द्वारा जवळ सूज आल्यामुळे हा त्रास होतो…

पाईल्स होण्या मागची कारण :

♥ अनुवांशिकता मुळे सुद्धा होतो मूळव्याध

♥ अति खाण्या पिण्याच्या सवयी

♥ फायबर ची कमी

♥ उशिरा पर्यंत एकाच जागी बसणे

मुळव्याधाची लक्षणे :

१) गुदद्वारा जवळ खाज येणे. २) गुदद्वारा जवळ वेदना होणे. ३) मलातून रक्ताच्या गाठी पडणे. ४) राहून राहून रक्त पडतच राहणे.

मुळव्याधावर आयुर्वेदिक उपचार :

लिंबाचा वापर :

लिंबू हा बऱ्याच आजारांवर रामबाण औषधाचे काम करते… यासाठी दोन ते तीन पातळ सालीच्या लिंबाचा रस अँनिमा द्वारे गुदद्वारातून आत घ्या , हीच प्रक्रिया दर १० ते १५ मिनिटांनी परत करा. आणि त्यानंतर शौचास जा. हा प्रयोग दर चार ते पाच दिवसातून एक वेळेस करावा. आणि हि प्रक्रिया ३ वेळा केल्याने मुळव्याधीत लाभ होतो.

मोठ्या वेलचीचा उपयोग :

मूळव्याधीचा उपचार करण्यासाठी मोठ्या वेलचीचा देखील वापर केला जातो. यात तुम्हाला ५० ग्राम मोठी वेलची तव्यावर टाकून भाजून घ्या , थंड झाल्यानंतर भाजलेली वेलची मिक्सर मध्ये वाटून घ्या. हे चूर्ण रोज सकाळी उपाशी पोटी पाण्यासोबत घेतल्याने मुळव्याधीत आराम पडतो…

जिरे :

या उपायात तुम्हाला ताक आणि जिरे याची आवश्यकता पडेल. जवळपास दोन लिटर ताक घेऊन त्यात ५० ग्राम बारीक केलेले जिरे आणि मीठ मिसळून घ्या. जेव्हा पण तहान लागेल तेव्हा पाण्या ऐवजी याच ताकाच्या मिश्रणाचा उपयोग करा. चार दिवसापर्यंत याचे सेवन केल्याने मुळव्याधीचे मोड ठीक होतात. जर ताक घेणे शक्य नसेल तर अर्धा चमचा जिरा पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून घेतल्याने हि भरपूर लाभ होतो…

जांभळाचे सेवन :

जांभळाची बी हि एक स्वास्थवर्धक औषधी आहे , मूळव्याधीच्या उपचारासाठी जांभळाच्या बी चे चूर्ण आणि आंब्याच्या कोईच्या आतील भागाचे चूर्ण एकत्र करून कोमट पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबर सेवन केल्याने चमत्कारिक लाभ होतो. तसेच रक्त पडत असल्यास ते हि थांबते… हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून ३ ते ४ वेळा करू शकता…

दालचीनीचा वापर :

दालचिनीचे सेवन अनेक रोगांमध्ये सहाय्यक असते. मुळव्याधी साठी पाव चमचा दालचिनीचे चूर्ण एक चमचा मधात मिसळून दररोज एकदा घ्यावे. असे केल्याने मुळव्याधीत चमत्कारिक फरक दिसतो …

कडुलिंबाचे तेल :

हे तेल मोडावर लावल्याने मोड सुकून लहान होतात ज्यामुळे मुळव्याधीत आराम मिळतो. कडुलिंबाचे तेल मिळाले नाही तर एरंडेल तेलाचा वापर करावा.

मनुके :

१०० ग्राम मनुके रात्रभर पाण्यात भिजत घालून ठेवावे , सकाळी उठल्यावर याच पाण्यात फुगलेले मनुके कुस्करून सेवन करावे. हा प्रयोग दररोज करावा ज्यायोगे मुळव्याधीत कमालीचा फरक तुम्हाला जाणवेल..

अशा प्रकारे मुळव्याधीत उपयोगात येणाऱ्या वेगवेगळ्या औषधांबरोबर वरील उपायांचा अवलंब केल्याने मुळव्याधीत लाभ मिळतो. आणि या असाध्य रोगापासून सुटका होते.

कपाळावर या जागी ४५ सेकंद दाबून ठेवा , होणारा फायदा बघून थक्क व्हाल