मृत्यू नंतर आपलं काय होतं हे तुम्हाला माहित आहे का ? विश्वास नाही बसणार तुमचा

0

मृत्यूनंतर काय होते हा प्रत्येकाच्या मनातील एक गूढ प्रश्न आहे. चांगल्या खान पानाने , व्यायाम करून , चांगली जीवनशैली ठेऊन मनुष्य आपले आयुष्यमान वाढवू शकतो. परंतु मृत्यू हा अटळ आहे , तो सर्वनाच्याच वाट्याला येतो. आज मानवाने वैज्ञानिक दृष्ट्या खूप प्रगती केली आहे , तरीही त्याला मृत्यवर विजय मिळवता आलेला नाही.ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यूला एक ना एक दिवस सामोरे जावेच लागणार आहे आणि हे एक शास्वत सत्य आहे. मृत्यू नंतर काय होते हे एक न उलगडलेले गूढ आहे. मी इथे भौतिक शरीराबद्दल बोलत नाहीये तर माझ्या बद्दल म्हणजेच आत्म्या बद्दल किंवा चेतने बद्दल बोलत आहे.

जिवंत मनुष्याचे शरीर हे चेतनशील असते. मनुष्य विविध ज्ञानेंद्रियानी सभोवतालचे ज्ञान प्राप्त करत असतो. पण काय हि चेतना मृत्यू नंतरही अशीच राहते ? कि पूर्ण पणे नष्ट होऊन जाते ? चला एक प्रयोग करून बघू : डोळे बंद करून स्वतःच्या मृत्यूची कल्पना करा , ज्या योगे तुम्ही चेतना शून्य झाला आहात. नाही जमत ना ? मनुष्य स्वतःचे अस्तित्व विसरू शकत नाही. म्हणूनच मृत्यू नंतर आत्माही चेतन स्वरूप राहतो. या पूर्ण जगात ४२०० पेक्षा जास्त धर्म आणि पंथ आहेत ज्यांमध्ये मृत्यू बद्दल वेगेगळ्या धारणा आहेत.पण मृत्यू नंतर नक्की काय होत हे फक्त आत्माच जाणू शकतो.परंतु आत्म्याशी संवाद साधन तत्वतः शक्य नाही.

जगभरात अशी काही लोक आहेत ज्यांचा मृत्यू काही काळासाठी झाला आणि ते पुन्हा जिवंत झाले. वैज्ञानिक भाषेत अश्या लोकांच्या अनुभवाला NDE ( Near Death Experience ) म्हणतात . NDE अनुभवलेल्या लोकांना असा अनुभव आला कि ते कुठल्या दुसऱ्या दुनियेत प्रवेश करत आहेत , जिथे त्यांना खूप विचित्र अनुभव येतात , आणि ते परत आपल्याच शरीरात प्रवेश करतात. २०११ साली अशाच एका व्यक्तीची शस्त्रक्रिया होत होती परंतु डॉक्टर त्या व्यक्तीस वाचवू शकले नाहीत. डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले त्या नंतर काही मिनिटातच मॉनिटर वर डॉक्टरांना काही हालचाल जाणवली आणि डॉक्टर त्या व्यक्तीला वाचवण्यात यशस्वी ठरले.

काही मिनिटांसाठी त्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके आणि श्वास पूर्णपणे बंद होता. त्या वेळेत व्यक्तीला आपण एका खूप लांब अश्या बोगद्यातून जात आहोत असा अनुभव आला. तर दुसऱ्या एका कॉलेज स्टूडेंटचा झोपेच्या गोळ्या जास्त घेतल्यामुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याआधीच मृत्यू झाला होता. परंतु काही वेळातच त्याचा श्वास पुन्हा सुरु झाला आणि त्या काही मिनिटातच त्याने स्वतःला आपल्या शरीरातून बाहेर पडलेले अनुभवले. तो स्वतःचे शरीर ऍम्ब्युलन्स मध्ये झोपलेले पाहू शकत होता, म्हणजेच त्याची आत्मा त्याचे शरीर पाहू शकत होती.या गोष्टींवर डॉक्टरांचा विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी त्याला विविध प्रश्न विचारायला सुरवात केली. त्याने सर्व प्रश्नांची उत्तर दिली जी खूपच आश्वर्यकारक होती. कारण डॉक्टरांनी एकमेकांसोबत बोललेल्या गोष्टी सुद्धा बरोबर सांगितल्या, त्या पूर्ण वेळेमध्ये तो मृत पावलेला होता तरीही त्याने उत्तर बरोबर दिली. हि झाली दोन उदाहरण. असे जगभरात लाखो लोक आहेत ज्यांना असे अनुभव आले आहेत. वैज्ञानिकांनी हे सर्व अनुभव एकत्र केले आणि त्यावर शोध सुरु केला. बहुतेक लोकांचे अनुभव असाच होता कि जणू ते एखाद्या बोगद्यातून जात आहेत. तर काही लोकांना स्वतःचे शरीर एका विशिष्ट अंतरावून दिसण्याचा अनुभव आला. यालाच आऊट ऑफ बॉडी अनुभव असे म्हणतात.

मृत्यू नंतर पुन्हा जिवंत झालेल्या व्यक्तींचे अनुभव हे जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेचे असतात. परंतु वैज्ञानिकाच्या मते हे अनुभव म्हणजे मनाचे खेळ आहेत कारण त्या काळात मेंदूला खूप कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो , त्यामुळे मेंदूला ( Hallucination ) भ्रम होतो.त्यामुळे मृत्यू नंतर काय होते हे आत्म्याशी सवांद साधल्या शिवाय कळू शकत नाही.

अधिक माहितीसाठी व्हिडियो बघा

म्हणून लग्नानंतर महिलांचे पृष्ठभाग होतात मोठे : कारण बघून शॉक बसेल